शिवसेचा ५४वा वर्धापन दिवस आणि पर्यावरण- पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे २० जून २०२० रोजी पवई आणि आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना अर्सेनिक अल्बम तर पोलीस दलातील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात उभी राहिलेली शिवसेना यावर्षी ५४ वर्षाची झाली आहे. यावर्षी महाविकासआघाडीसोबत महाराष्ट्रात केवळ सत्तेत न येता मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान झाले आहेत. ठाकरे कुटुंबातल्या सदस्याने थेट सरकारचा भाग होऊन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवसेनेचा वर्धापन दिवस आणि शिवसेना नेते, पर्यावरण- पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे कोरोना महामारीचा विचार करता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत विजय आश्रम, विक्रोळी येथील वयोवृद्धांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पवई पोलीस ठाणे, पार्कसाईट पोलीस ठाणे, कन्नमवारनगर पोलीस ठाणे आणि कांजुरमार्ग पोलीस ठाणेमधील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना, युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.