महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याबद्दल सोमवारी शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. चांदिवली संघर्षनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा होत नागरिकांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला. कर्नाटक सरकारच्या या कृत्याच्या निषेधार्थ चांदिवली संघर्षनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून […]




















