पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. […]



















