पवई येथे दूध खरेदीसाठी निघालेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकल चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी घडली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अधिकाऱ्याच्या गळ्यातील १.१२ लाख किंमतीची सोनसाखळी खेचून पळ काढला. पवई येथे राहणारे आणि भारतीय तटरक्षक दलात अधिकारी असलेले बिनू नायर (३९) हे सोमवारी घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडले होते. पवई येथील आदि शंकराचार्य मार्गावर […]


















