Tag Archives | Powai

powai lake overflow

पवई तलावाची दुरुस्ती; पालिका गळती रोखून सुरक्षित करणार तलाव

मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या पवई तलावाची सगळ्याच बाजूने दुर्दशा होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका प्रशासनाने आता याच्या दुरुस्तीसह गळती रोखण्याच्या निर्णय घेतला आहे. पश्चिम उपनगरातील महत्वाच्या काही पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलाव भागास लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात तलाव भागात आणि तलावाच्या झालेल्या दुर्दशेमुळे पर्यटक याकडे पाठ फिरवू लागले आहेत. […]

Continue Reading 0
Cement mixer overturned at powai

एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला

शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
shivsena blood donation

शिवसेना शाखा १२२ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना शाखा १२२च्यावतीने शनिवार १९ डिसेंबर आणि रविवार २० डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला पवईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री गणेश मंदिर, श्रीगणेशनगर,पंचकुटीर व पवई इंग्लिश हायस्कूल, रमाबाई नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस आयोजित या शिबिरात २६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

Continue Reading 0
UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive to educate the community on waste management1

UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive to educate the community on waste management

Press Release Young Environmentalists Programme Trust Mumbai in partnership with UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive at the Powai Lake on Wednesday, 23rd December to educate the community on waste management. Keeping social distancing and PPE in place participants came together and collected plastics from the Powai Lake source areas […]

Continue Reading 0
water cut copy

संपूर्ण मुंबईत २२ डिसेंबरला पाणीकपात; संघर्षनगरमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद

संपूर्ण मुंबईत २२ आणि २३ डिसेंबरला १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे ही पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिकातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ‘एन’ व ‘एल’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील असे जल […]

Continue Reading 0
indians social movement

पवई तलाव परिसराला नशेखोरांचा विळखा; तरुणांचे जनजागृती अभियान

@अविनाश हजारे – मुंबईतील पवई तलाव हे मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठिकाण राहिलेले आहे. या निसर्गरम्य पवई तलावाला असंख्य पर्यटक भेटी देत असतात. परंतु, पोलीस व पालिकेचा वचक नसल्याने या भागात नशेखोरांनी विळखा घातला आहे. पवई तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंतच्या परिसरात कायमच काळोखाचे साम्राज्य असल्याने नशेखोरांचे फावत असून, येथील विविध ठिकाणी गर्दुल्ले आणि दारुडे गट […]

Continue Reading 0
weather teller

डिसेंबरमधील दुसरे सर्वोच्च किमान तापमान; पवईमध्ये हलक्या सरी

मुंबईमध्ये पाठीमागील आठवड्यात शुक्रवारी डिसेंबरमधील सर्वांत कमी तापमान नोंद झाल्यानंतर या आठवड्यात मुंबईचा पारा पुन्हा खाली पडला. गुरुवारी पहाटे शहराला जाग आली ती कुडकुडायला लावणाऱ्या गुलाबी थंडीने. हवामान खात्याच्या सांताक्रूझ वेधशाळेचे रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जे दशकातील दुसर्‍या क्रमांकाचे किमान तापमान आहे. तर गुरुवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे […]

Continue Reading 0
powai lake cleanup0

हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. […]

Continue Reading 0
farmer protest human chain000

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवईमध्ये आंदोलन, मानवी साखळी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. पवईतील […]

Continue Reading 0
temperature powai

शुक्रवारी पवईमध्ये हंगामाचे सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले

मुंबईत आता गारठा वाढू लागला असून, शुक्रवारी मुंबईत आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. सांताक्रूझ हवामान वेधशाळेत या दिवशी १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जे सामान्यते पेक्षा कमी होते. तर दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान स्टेशनमध्ये २२.५ अंश डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पवईमध्ये शुक्रवारी मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १८.३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. […]

Continue Reading 0
cheating in name of police

व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक

मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा […]

Continue Reading 0
Powai police arrested a thief who broke a shop and stole mobile phone worth Rs 1.5 lakh

दुकान फोडून दीड लाख किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ […]

Continue Reading 0
Fire breaks out at powai NTPC mhada building

पवईच्या एनटीपीसी म्हाडा कॉलनीत रहिवाशी इमारतीत आग

पवईतील एनटीपीसी म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशी इमारतीला आज, ३० नोव्हेंबर संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या ३ ते १४ माळ्यावरील बाहेरील भागात ही आग पसरलेली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

बलात्कारच्या गुन्ह्यात एकाला अटक

आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख […]

Continue Reading 0
aarey road entry restricted

पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]

Continue Reading 0
covid test IIT powai

पवईतील भाजी विक्रेत्यांची मनपाकडून कोविड चाचणी

कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत असतानाच सर्वांत जास्त संपर्कात असणारे पवईतील भाजीपाला विक्रेते आणि हॉकर्स यांची मनपा ‘एस’ विभागाच्यावतीने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी कोरोना टेस्ट घेण्यात आली. यावेळी जास्तीतजास्त विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. देशभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या ‘कोविड-१९’शी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका मोठ्या ताकदीने लढत आहेत. मात्र टाळेबंदी हटल्यानंतर खुले […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक

पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]

Continue Reading 0
tunnel-boring-machine-stuck-near-powai

पवईमध्ये बोगद्यात वर्षभरापासून अडकून पडलेली टीबीएम मशीन काढणार कशी? तज्ञांना पडला प्रश्न

पाणी चोरी रोखणे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून मुंबईचे जुने पुरवठा नेटवर्क सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेरावली ते घाटकोपर ६.६ किमी लांबीचे पाणीपुरवठा बोगदा तयार करीत आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदणारी मशीन (टीबीएम) पवईजवळ बोगद्यात वर्षभरापासून अडकली आहे. वर्षभरात या मशीनला काढण्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र […]

Continue Reading 0
ek hath mayecha1

बालक आश्रमात “एक घास मायेचा”

“एक घास मायेचा” उपक्रमांतर्गत ठाणे येथील बालक आश्रमातील बालकांना रविवारी पवईकर आणि चांदिवलीकर यांच्या मदतीतून मायेचा घास मिळाला आहे. मुंबईचा महाराजाधिराज व माऊली फाऊंडेशन यांच्या संयुक्त संयोजनच्या माध्यमातून “एक घास मायेचा” या अन्नदान उपक्रमा द्वारे जमा केलेले साहित्य, गहू, तांदूळ, डाळ, पोहे, सुका खाऊ, साबण, तेल, टूथपेस्ट, ताक, लस्सी, बिस्कीट, चॉकलेट्स ठाणे येऊर येथील विवेकानंद […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!