इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडद्वारे सुरु असणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचा भाग असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या बांधकामाची सोय करण्यासाठी, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील पवईतील काही भागात वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात येत वाहतूक वळवण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (पूर्व उपनगर ) डॉ.राजू भुजबळ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. वाहतूक निर्बंध २४ जानेवारी २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज रात्री ००:०० ते सकाळी ०६:०० पर्यंत लागू केले जाणार आहेत.
बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग:
मार्ग १: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उत्तर वाहिनीवरील गणेश घाट ते रामबाग पूल रस्ता बंद असेल.
पर्यायी मार्ग: प्रवाशांनी गणेश घाटाकडून रामबागकडे जाताना ब्रिजच्या साउथ चॅनलमार्गे पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर सदर पुलावरील दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे.
मार्ग २: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड दक्षिण वाहिनीवरील पवई प्लाझा ते एनटीपीसी चौक पर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल.
पर्यायी मार्ग: पवई प्लाझा पासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड नॉर्थ चॅनल (उत्तर वाहिनी) वरून एनटीपीसी जंक्शनकडे जाणाऱ्या रिव्हर्स लेनचा वापर करावयाचा आहे. पुढे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड दक्षिण वाहिनीने मार्गस्थ होतील.
No comments yet.