कचरयाची कुंडी तुडुंब भरली; पालिकेला उचलायला वेळ मिळेना

पवईतील आयआयटी मार्केट गेट समोरील माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नंबर २ येथे पालिकेतर्फे ठेवण्यात आलेली कचराकुंडी संपूर्ण भरून कचरा रस्त्यावर पोहचला आहे. यामुळे नागरिकांना घाण दुर्गंधी सारखे त्रास होत असतानाही पालिकेने याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे.

थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी साचून राहिलेली घाण आता रस्त्यावर येवू लागली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी, घाण आणि आजार पसरण्याचे संकट निर्माण झाले आहे. पवईतील रमाबाई आंबेडकरनगर ग्रुप २ भागात सुद्धा सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील नागरिकांच्या घरातील कचरा टाकण्यासाठी परिसरात पालिकेच्यावतीने एक कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे. या कचराकुंडीत नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे सध्या ही कचराकुंडी भरून कचरा रस्त्यावर पसरू लागला आहे. मात्र याची ना ही स्थानिक नगरसेवक ना ही पालिकेने दखल घेतलेली पहावयास मिळत आहे.

“आयआयटी मार्केट पवई, माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नंबर २ या ठिकाणी असलेली कचराकुंडी संपूर्ण भरली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोणतीही कचऱ्याची गाडी त्याला उचलण्यासाठी आलेली नाही. कचरा पूर्ण रस्त्यावर वाहत आहे पावसामुळे शेजारी दाट वस्ती आहे व बुद्ध विहार आहे रोगराई पसरण्याची शक्यता खूप आहे.” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक निखील खंडागळे यांनी सांगितले.

“आम्ही स्थानिक नगरसेवकांना पण याची माहिती दिली आहे. मात्र त्यांनाही आमच्या या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना.” असेही याबाबत बोलताना काही नागरिकांनी सांगितले.

यासंदर्भात आवर्तन पवईने स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही. पालिका एस विभागाने लवकरच आम्ही कचरा उचलू असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!