इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओ.आय.पी.ए.), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) व प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) यांच्या संयुक्त बचाव पथकाने पवई येथील आयआयटी बॉम्बे परिसरातून सुमारे ३ फूट लांबीच्या मगरीची यशस्वीरित्या सुटका केली आहे.
सतर्क नागरिक विनोद पाटोळे यांनी रात्री १२:३० वाजता माहिती देताच संयुक्त बचाव पथकाचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सुरक्षित पद्धतीने मगरीला पकडून तिची पशुवैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय डॉ. मनीष पिंगळे यांनी केली. तपासणीनंतर मगर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाल्यावर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
एसीएफच्या निशा कुंजु यांनी यावेळी बोलताना नागरिकांना आवाहन केले की, मगर किंवा इतर कोणताही वन्य प्राणी आढळल्यास घाबरून जाऊ नये. तसेच त्याला पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये.
वन्यजीव आपत्कालीन मदतीसाठी हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईन १९२६ किंवा टीम ओआयपीए, एसीएफ आणि पॉज-मुंबई हेल्पलाईन ९८३३४८०३८८ वर संपर्क साधावे.



No comments yet.