हिरानंदानी पवई येथील क्लिफ अव्हेन्यू मार्गावर हेरीटेज उद्यानाच्या बाहेर बनत असलेल्या बीट चौकीचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवार, २९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता याचे उद्घाटन केले जाणार आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन केले जाणार आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही बीट चौकी बनवण्यात आली आहे. हिरानंदानी परिसरात […]
Archive | Powai News
Jitendra Sonawane has taken charge as Sr. PI Powai Police Station
Senior Police Inspector (Sr PI) Budhan Sawant of Powai Police Station retired on August 30, and Senior Police Inspector JITENDRA SONAVANE has taken charge. Sonavane, who has worked in various police stations across Maharashtra, led the investigation into the Akola kidney racket case. On Thursday, September 14, he took charge as Senior Police Inspector of […]
जितेंद्र सोनावणे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी; अकोला किडनी रॅकेट गुन्हा तपासाचे केले होते नेतृत्व
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) (Senior Police Inspector) बुधन सावंत ३० ऑगस्टला सेवानिवृत्त (retired) झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे (Sr. PI Jitendra Sonavane) यांनी पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रभर विविध पदांवर काम करणाऱ्या सोनावणे यांनी अकोला किडनी रॅकेट गुन्ह्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. गुरुवार, १४ सप्टेंबरला त्यांनी पवई […]
पवई पोलिसांनी मुंबईकरांचे हरवलेले ५० मोबाईल फोन दिले परत मिळवून
मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक […]
पवई एअर होस्टेस खून प्रकरणातील आरोपीची कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या
पवई: २३ वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगरेचा मरोळ येथील फ्लॅटमध्ये गळा चिरून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कचरा संकलन कर्मचारी विक्रम अटवाल (३५) याने आज (शुक्रवार), ८ सप्टेंबर सकाळी अंधेरी लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. यासंदर्भात अपमृत्त्यू नोंद करून अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत. गळा चिरून हत्या रविवार, ३ सप्टेंबरला संध्याकाळी […]
पवईत जेविएलआरवर दोन अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी
पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलला पाठीमागून धडक देवून झालेल्या दोन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही अपघातात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अटक केली आहे. पवईतील रामबाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय आरती शंकर हारके या सोमवारी संध्याकाळी १० वाजता […]
पवईतील सैन्यदलातील जवानाचा श्रीनगरमध्ये कर्तव्यावर मृत्यू, लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार
पवईकर, २७ वर्षीय लान्स नाईक विजय कोकरे यांचा २० जुलै रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटमध्ये तैनात होते. शनिवारी (२२ जुलै) पहाटे पवईतील चैतन्यनगर येथे या वीरपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भर पावसात हजारो लोकांनी गर्दी केली होती. लान्स नायक विजय कोकरे हे मूळचे महाराष्ट्रातील सातारा येथील वासरवाडी […]
तरुणांनी हटवला हरिश्चंद्र मैदानाच्या फुटपाथवरील कचऱ्याचा ढिग; कचरा फेकणाऱ्यावर ५०० रुपये दंड
पालिका, निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी, नेते मंडळी यांना बगल देवून तरुणांनी आपला परिसर स्वतः साफ करत त्यांच्या सणसणीत कानाखाली देत आता पुढच्या वेळी तुमची साफ होण्याची बारी आहे असा संदेशच या कार्यातून दिला आहे. आपला परिसर स्वच्छ राखणे, निटनेटका ठेवणे हे कोणा एकाचे काम नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. हेच ध्येय समोर ठेवत आयआयटी, […]
मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने काढली निविदा; ९८९ कोटींचा खर्च
मेट्रो ६ ही लाईन पूर्णपणे उन्नत असून, वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडते. अंधेरीतील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मेट्रो लाईन-६ मार्गावर धावणाऱ्या सहा डब्यांच्या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची […]
जोरदार पावसामुळे हिरानंदानीत झाडे उन्मळून पडली; दोन गाड्यांचे नुकसान
शुक्रवारी मुंबईमध्ये पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार हवा आणि पावसामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरात दोन झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. रस्त्यावर ही झाडे पडल्याने दोन गाड्यांचे नुकसान झाले. तसेच जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. हिरानंदानी येथील क्लिफ एव्हेन्यू रोडवर लेक कॅसल इमारतीसमोर शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कॅना इमारतीसमोर असणारी दोन […]
पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एक जखमी
पवईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) गांधीनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवार, २९ जून दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०८ आर ८१३२ गांधीनगरकडून पवईच्या दिशेने जात होती. कार सनसिटी […]
Peacock will be Seen in the Powai Nature Park; HHH, Burns and Mcdonnell Environment Project
On 27th June Helping Hands for Humanity (HHH) – a non-profit organisation in collaboration with Burns and McDonnell, a renowned engineering and design firm installed a magnificent peacock sculpture at Powai Nisarg Udyan, a public green space. The sculpture serves as a symbol of environmental consciousness, highlighting the importance of preserving native wildlife and ecosystems. […]
स्विमिंग पूलमध्ये बुडून १० वर्षीय मुलीचा मृत्यू
स्विमिंग पूलमध्ये बुडून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई भारतनगर परिसरात राहणारी दहा वर्षीय प्रियांशी पांडे ही आपल्या काही मित्रांसह परिसरात खेळत होती. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास खेळता खेळता आपल्या मित्रांसह ती […]
मोठी बातमी: पंचसृष्टी रोड वाहतुकीसाठी खुला
गुरुवार, २२ जूनला चांदिवली आणि पवई परिसरात चक्काजाम निर्माण झाल्यानंतर अखेर पंचसृष्टी/ राणे सोसायटी रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चांदिवली – हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या या मार्गावर ४ जूनपासून सिमेंट कॉंक्रीटीकरण काम सुरु असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र प्रवाशांचे होणारे हाल पाहता गुरुवारी संध्याकाळपासून वेळेआधीच हलक्या वाहनांसाठी हा रोड वाहतुकीसाठी खुला […]
पवईत तरुणांचा आक्रोश मोर्चा
नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाच्या झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेर्धात तसेच मुंबई येथे तरुणीचा छळ करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात पवईमध्ये रविवारी, १८ जूनला तरुणाईच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भन्ते शिलबोधी आणि भिख्खू संघाच्या नेतृत्वात पवईतील फिल्टरपाडा येथून पवई पोलीस ठाणे पर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात […]
पवईत मिठी नदीवर ९ कोटी खर्च करुन बांधणार नवा पूल
नवीन पूल बांधताना त्याचे रुंदीकरण करत पुलाची लांबी ३३.६ मीटर तर रुंदी ९.३ मीटर करण्यात येणार आहे. पवईत मोरारजी नगर परिसरात मिठी नदीवर असलेला जुना पूल पाडून आता नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आधीच्या पुलाची दुरावस्था झाल्याने नवीन पूल बांधला जाणार आहे. यासाठी निविदेद्वारे एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन […]
आयआयटी स्टाफ कॉटर्स समोरील रोडच्या सिमेंटीकरण कामाचा नारळ फुटला
चांदिवलीला हिरानंदानी कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या पंचसृष्टी कॉम्प्लेक्स मार्गे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स रोडच्या सिमेंटीकरण कामाचा नारळ रविवार, ४ जूनला फोडण्यात आला. पंचसृष्टी कॉ. ऑप. हौ. सोसायटी फेडरेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून अखेर या कामाला सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स ते भग्तानी क्रीशांग पर्यंतच्या […]
पवईमध्ये बत्ती गुल, रहिवाशांची मॉल, कॉफीशॉपकडे धाव
मुंबई शहरातील सर्वाधिक विजेची मागणी बुधवारी दुपारी ३,९६८ मेगावॅटच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. त्यानंतर शहराच्या काही भागांमध्ये काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. गोरेगाव पट्ट्यात दुपारी उशिरा सुमारे दोन तास पुरवठा खंडित झाला. तर विक्रोळी आणि पवईसह पूर्व उपनगरातील काही भागांना संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाळ्यात तासभर वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांचा चांगलाच घामटा फुटला. पवईतील […]
पवईतील प्रकल्प स्थळाजवळ दिसले मासे, ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्पाला यश
नदीचा नाला झालेल्या मिठी नदीमध्ये मासे दिसणे म्हणजे एक दुर्मिळ बाब. मात्र त्याच मिठी नदीत आता थोड्याफार प्रमाणात का होईना मासे दिसू लागले आहेत. ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत त्यात आता […]
HHH Group’s Helping Hand for Malad Fire Victims
On March 27th, the “Helping Hands for Humanity” (HHH) NGO went to the disaster-stricken area of Appa Pada, Malad to distribute ration packets to those affected by the recent outbreak of fire. The fire devoured more than 800 huts, making the families lose whatever they owned within a few minutes. Hundreds of families were left […]