मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
Tag Archives | पवई पोलीस
महिलेचा पाठलाग करून, फोनवरून सतावणाऱ्या रोमिओला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या विधवा महिलेला वारंवार फोन करून आणि तिचा पाठलाग करून जेरीस आणणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतीश शिंदे (२४) असे या तरुणाचे नाव असून पवई येथील तुंगागाव परिसरात हा तरुण आपल्या आईसोबत रहावयास आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका खाजगी कंपनीत काम […]
आई-वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून बहिण-भावाची सायकलने शाळेकडे धाव
आई वडिलांनी शाळेत जावू दिले नाही म्हणून पवईतील एका भाऊ – बहिणीने बुधवारी सायकलने शाळेकडे धाव घेतली. मात्र मुले न सांगता अचानक गायब झाल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पवई पोलिसांनी काही मिनिटातच तांत्रिक माहितीच्या साहाय्याने त्यांना शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज सुरु […]
पवई, चांदिवलीमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
आज संपूर्ण देशभरात ७३वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित जमा होण्यावर काही निर्बंध घातले असले तरीही या वर्षीही तेवढ्याच उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पवई आणि चांदिवली परिसरात पाहायला मिळाला. पवई आणि साकीनाका पोलीस ठाणे आणि […]
बुधन सावंत यांनी स्वीकारला पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा पदभार
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची […]
रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन
पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
शाब्बास रे वाघा ! पाठलाग करून एकट्याने पकडले दोन मोबाईल चोर
मुंबई पोलिसांच्या कार्यामुळेच मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय स्थान कमावले आहे. ते तेवढेच खरे सुद्धा असल्याची प्रचिती नुकतीच पवई परिसरात आली. आपले कर्तव्य संपवून परतत असताना दोन मोबाईल चोर चोरी करून पळत असल्याचे दिसताच पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पठारे यांनी कसलाच विचार न करता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या […]
पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
बाईक स्टंट करणाऱ्या सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सरला पवई पोलिसांचा दणका; परवाना निलंबित, बाईक जप्त
पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकल बाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुन्हा असे कृत्य […]
दिपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आदिवाशी पाड्यांमध्ये अन्नधान्य वाटप
गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पवईतील दिपस्तंभ प्रतिष्ठानच्यातर्फे रविवारी येथील आदिवासी पाड्यांमध्ये अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी आणि पवई पोलिसांतर्फे या किटचे वाटप आदिवासी पाड्यातील बांधवाना करण्यात आले. कोरोनाला थोपवण्यासाठी करण्यात आलेल्या लाकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसण्याची वेळ आली आहे. अशात बेरोजगारी आणि कामाच्या कमीमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. […]
मित्रांसोबत पार्टी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्याने केली फसवणूक; पुण्यातून अटक
पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना […]
पवईत व्यावसायिकाचा गळा चिरून खून
पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. […]
पवईत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गुंडांना सोडण्याची मागणी करणाऱ्या आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करा – डॉ. राजन माकणीकर
आपले कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडून देण्याची फोनवरून मागणी करणारे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. पवईतील हिरानंदानी भागात अपघात करून महिलेसोबत वाद घालणाऱ्या ३ तरुणांना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस […]
सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत
पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]
हिरानंदानीतून पार्क केलेल्या रिक्षाची चोरी
सावधान ! तुमची वाहने कुठेतरी पार्क करून घरी जात असाल तर सावधान. तुमचे वाहन होऊ शकते चोरी. हिरानंदानीतील रस्त्यांवर पार्क केलेली एक ऑटो रिक्षाची चोरी झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत रिक्षा मालकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी तुंगागाव येथून एक मोटारसायकल चोरी झाल्याचे समोर येत असून, […]
हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख
अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]
ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी
‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]