गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! गर्जनेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत भावपूर्ण आणि जड अंतकरणाने पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर आणि पवई, चांदिवली येथील कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने […]
Tag Archives | Avartan Powai
५ दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! गर्जनेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात शनिवारी अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत भावपूर्ण आणि जड अंतकरणाने पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर आणि पवई, चांदिवली येथील कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. या वर्षी देखील मोठ्या […]
महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये
मोबाईल चोराला पकडण्यासाठी पोहचलेल्या पोलीस पथकाला एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. खेरवाडी ते विलेपार्ले दरम्यानच्या परिसरात ५ ऑगस्टला तासाभरात सात मोबाईल चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हे सातही मोबाईल चोरले […]
मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने काढली निविदा; ९८९ कोटींचा खर्च
मेट्रो ६ ही लाईन पूर्णपणे उन्नत असून, वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडते. अंधेरीतील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मेट्रो लाईन-६ मार्गावर धावणाऱ्या सहा डब्यांच्या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची […]
फोन दुरुस्तीसाठी देणे पडले महागात; खात्यातून २ लाख उडवले
मुंबईच्या साकीनाका भागातील एका व्यक्तीला आपला मोबाईल दुरुस्त करून घेणे महागात पडले आहे. साकीनाका येथे मोबाईल फोन रिपेअरिंग स्टोअरच्या कर्मचाऱ्याने त्याची २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० वर्षीय पीडित कदम यांनी आपला मोबाईल फोन मोबाईल रिपेअरिंग स्टोअरला दुरुस्तीसाठी दिला होता. दुरुस्तीच्या काळात मोबाईल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने […]
पवई तलाव गणपती विसर्जन २०२२ (Powai Lake Ganesh Visarjan 2022, Part -1)
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. परंतु पाठीमागील २ वर्ष कोरोनाच्या संकटामुळे […]
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडच्या कामाला सुरुवात; रस्ता वाहतूकीसाठी बंद
पाठीमागील अनेक वर्ष दुरावस्थेत असलेल्या पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रोडच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आवर्तन पवईने याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात ‘पवई विहारचा रस्ता खड्यात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल’ अशा मथळ्याखाली बातमी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे […]
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल
मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
संडासच्या डब्यावरून भांडण; तरुणाचा खून; पसार झालेल्या दोघांना सोशल मीडियाच्या आधारे दोन तासात अटक
संडासचा डब्बा वापरण्यावरून सुरु झालेल्या वादातून शाब्दिक शिवीगाळ केल्यानंतर मयतावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून करून आरोपी पसार झाले होते. View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) शाब्दिक भांडणानंतर २१ वर्षीय तरुणाची पवई येथे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यासंदर्भात सोशल मिडीयाच्या मदतीने पवई पोलिसांनी पसार झालेल्या अजय […]
पवईत नाल्यातील पाण्याचा डिस्को डान्स; उघडा डोळे, बघून चाला, होणारा अपघात टाळा
पहिल्याच पावसात पवईच्या नालेसफाईची पोलखोल View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) पावसाळ्याच्या सुरुवातीला नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करणाऱ्या पालिका आणि लोकप्रतिनिधींची पहिल्याच पावसात पोलखोल होत असते. पवईमध्ये देखील सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे पालिका आणि लोक प्रतिनिधींनी केलेल्या कामांचे पितळ उघडे पडलेले पाहायला मिळाले. दोन दिवस […]
पवई तलाव भरुन वाहू लागला
१८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०५.०७.२०२२) सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या […]
पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]
माझा बाप्पा भाग २
चांदिवली – हिरानंदानीला जोडणाऱ्या नवीन ६० फुटी रोडच्या कामाला सुरुवात
चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. या दोन विभागांना जोडणारा पंचश्रुष्टी आणि जेविएलआर, रामबाग मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र यातील पंचश्रुष्टी मार्गावर खराब रस्त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी असते, तर जेविएलआर, रामबाग मार्गे फिरून जाणे खूप लांब पल्ल्याचे पडते. मात्र, आता या परिसरात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. […]
New Connecting Road to Chandivali-Hiranandani Complex Work Begins
Route will connect to the Hiranandani Complex area via D’mart Chandivali, Vicinia (Shapoorji Pallonji), Sangharsh Nagar Jama Masjid and Pawar Public School Pramod Chavan The number of citizens travelling in the Chandivali and Hiranandani Garden complex areas is very large. Panch Srishti and JVLR-Rambagh Marg connecting these two sections are available for the citizens. However, […]
एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला
शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]
सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत
पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]
आयआयटीच्या प्राध्यापकांची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
कौटुंबिक वादातून मुलाचा वडिलांकडून खून
कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोलीस शिपाई असणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना १६ मार्चला पवई येथील गणेशनगर परिसरात घडली. हरिष गलांडे (४०) असे या मुलाचे नाव असून, घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या […]