On 27th June Helping Hands for Humanity (HHH) – a non-profit organisation in collaboration with Burns and McDonnell, a renowned engineering and design firm installed a magnificent peacock sculpture at Powai Nisarg Udyan, a public green space. The sculpture serves as a symbol of environmental consciousness, highlighting the importance of preserving native wildlife and ecosystems. […]
Tag Archives | BMC
डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना धोका पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे पालिकेचे आवाहन
दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसात मुंबईत डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यावर्षी देखील मुसळधार पावसात दरड कोसळण्याचा धोका आणि पाण्याच्या लोंढ्यामुळे झोपड्यात पाणी शिरून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई, भांडूप, विक्रोळीतील डोंगराळ भागातील चाळसदृश्य घरात राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन पालिका […]
पवई तलाव सांडपाणीमुक्त करण्यासाठी पालिकेतर्फे सल्लागाराची निवड
पवई तलावात सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) अखेर सल्लागार सापडला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी टंडन अर्बन सोल्युशन्स या सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला पाठीमागील आठवड्यात मंजुरी दिली आहे. कंपनी येत्या ६ महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यानंतर सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कंपनीशी सल्लामसलत करण्यासाठी पालिका ६७.८० लाख […]
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडच्या कामाला सुरुवात; रस्ता वाहतूकीसाठी बंद
पाठीमागील अनेक वर्ष दुरावस्थेत असलेल्या पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रोडच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आवर्तन पवईने याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात ‘पवई विहारचा रस्ता खड्यात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल’ अशा मथळ्याखाली बातमी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे […]
पंचसृष्टी रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा नारळ फुटला; मंगळवारपासून कामाला सुरुवात
केवळ हलकी वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास अनुमती असणार आहे. इतर वाहतूक डीपी रोड क्रमांक ९वरून वळवण्यात आली आहे. पंचसृष्टी रोडच्या विकास कामाचा नारळ फोडल्याच्या वर्षभरानंतर अखेर या कामाला मुहुर्त लागला असून, मंगळवारपासून रोडच्या कामाची सुरुवात होणार आहे. चांदिवलीकडून हिरानंदानीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर (पश्चिम भागात) या कामाची सुरुवात होणार असून, केवळ हलकी […]
पवईमध्ये बोगद्यात वर्षभरापासून अडकून पडलेली टीबीएम मशीन काढणार कशी? तज्ञांना पडला प्रश्न
पाणी चोरी रोखणे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून मुंबईचे जुने पुरवठा नेटवर्क सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेरावली ते घाटकोपर ६.६ किमी लांबीचे पाणीपुरवठा बोगदा तयार करीत आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदणारी मशीन (टीबीएम) पवईजवळ बोगद्यात वर्षभरापासून अडकली आहे. वर्षभरात या मशीनला काढण्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र […]
एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर
@अविनाश हजारे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस विभागाचे’ सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या बदलीनंतर बरेच दिवस रिक्त असणाऱ्या सहाय्यक आयुक्तपदी विभास आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. एस विभाग प्रशासनाच्या हद्दीत मुख्यत्वे पवई, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर आदी. परिसर येतात. पालिका ‘एफ साऊथ’ ( परेल) विभागात ते यापूर्वी कार्यरत […]
कचरयाची कुंडी तुडुंब भरली; पालिकेला उचलायला वेळ मिळेना
पवईतील आयआयटी मार्केट गेट समोरील माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नंबर २ येथे पालिकेतर्फे ठेवण्यात आलेली कचराकुंडी संपूर्ण भरून कचरा रस्त्यावर पोहचला आहे. यामुळे नागरिकांना घाण दुर्गंधी सारखे त्रास होत असतानाही पालिकेने याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी साचून राहिलेली […]
कोविड-१९ लढाईत सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिकेच्यावतीने सन्मान
देशासह राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या कोरोनाला रोखण्याच्या लढाईत कोरोना योद्ध्यांना आणि यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिका एस विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. गुरुवार, २३ जुलै रोजी ‘एस’ प्रभागमधील आरोग्य विभागाच्या एका टीमने पवईच्या चार गृहनिर्माण संस्थांचा त्यांच्या इमारतीत कोविड-१९ व्यवस्थापन करण्यासाठी दिलेल्या चांगल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कौतुकपत्र देत सन्मान केला. पवईच्या […]
पवईत ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग
पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग आता हळूहळू मंदावू लागला आहे. २९ मे ते ३ जून २०२० या पाठीमागील ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवार २९ मे रोजी ४ जणांना, शनिवार ३० मे रोजी ६ जणांना, रविवार ३१ मे रोजी ५ जणांना, सोमवार १ जून ३ जणांना, मंगळवार २ जून […]
पवईत तीन दिवसात २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
पवई (Powai) परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा २७० वर पोहचला असून, पाठीमागील तीन दिवसात यात २८ बाधितांची भर पडली आहे. यात मंगळवार २६ मे रोजी ३, बुधवार २७ मे रोजी ९ तर गुरुवार २८ मे रोजी १६ कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) मिळून आले आहेत. एका बाजूला पवईतील बाधितांचा कोरोनामुक्त होत रिकवरी रेट वाढत असतानाच मोठ्या […]
फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले
पवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर […]
पवईत आज ६ कोरोना बाधितांची नोंद
पवईतील कोरोना बाधितांच्या संख्येने २०० बाधितांचा टप्पा पार केला आहे. सोमवार, २५ मे रोजी यात ६ बाधितांची वाढ झाली आहे. सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील दोघे तर अगोदर मिळून आलेल्या बाधिताच्या परिवारातील व्यक्तीचा समावेश आहे. पालिकेतर्फे हे संपूर्ण परिवार सिल करण्यात आले असून, नागरिकांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई भोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस […]
न्यूज अपडेट: गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
न्यूज अपडेट: शनिवारी आयआयटी पवई समोरील भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद. आयआयटी पवई समोरील गरिबनगर, चैतन्यनगर, हनुमान रोड, टाटा पॉवर कॉलोनी येथे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
पवईत आत्तापर्यंत १७८ कोरोना बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ३८%
पवई परिसरात कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत चालला असून, २१ मे पर्यंत पवई परिसरात १७८ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात ६६ महिला तर ११२ पुरुषांचा समावेश आहे. या आकड्यात सर्वात कमी मार्च महिन्यात तर सर्वात जास्त ही मे महिन्यात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यात रिकव्हरी रेट हा ३८% वर […]
एस विभाग हद्दीत ७५५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; १८० जण कोरोनामुक्त
@अविनाश हजारे – मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर या भागात आतापर्यंत ७५५ रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील १८० जण कोरोनामुक्त झाले असून, डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवले आहे. तर २१ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पालिकेच्या १८ मे रोजीच्या यादीतून ही गोष्ट उघडकीस आली आहे. पालिका एस विभागाच्या यादीनुसार […]
जेवणाअभावी अलगीकरणातील नागरिकांवर उपासमारीची वेळ; पवई क्वारंटाईन सेंटरमधील प्रकार
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागातील विविध क्वारंटाईन सेंटरमधील लोकांना पुरवण्यात येणारे अन्न अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र रविवारी तर क्वारंटाईन सेंटरमधील या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. पवई आणि कर्वेनगर येथील इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरमधील जवळपास २००० नागरिकांवर रविवारी उपाशी राहण्याची वेळ आली. संध्याकाळी ४ पर्यंत जेवण आले नसल्याने संतप्त नागरिकांनी इमारतीखाली […]
पवईत आजपर्यंत ९४ कोरोना पॉझिटिव्ह; आयआयटी फुलेनगर हॉटस्पॉट
बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस यांच्याकडे नोंदवण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पवईतील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सोमवार, ११ मे पर्यंत ९४ वर पोहचला आहे. बरेच दिवस चाळसदृश्य लोकवस्तीत मर्यादित राहिलेल्या कोरोना विषाणूमुळे पवईतील इमारत भागात राहणारे रहिवाशी सुद्धा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आयआयटी मार्केटजवळ असणारा फुलेनगर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाला आहे. सोमवार अखेरपर्यंत […]