स्विमिंग पूलमध्ये बुडून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई भारतनगर परिसरात राहणारी दहा वर्षीय प्रियांशी पांडे ही आपल्या काही मित्रांसह परिसरात खेळत होती. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास खेळता खेळता आपल्या मित्रांसह ती […]
