पवईत शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी पवईतील श्री गणेश नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘शिव जयंती उत्सव समिती, पवई‘ यांच्या वतीने आयोजित या शिबिरात ५८ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये ५ महिलांनी हिरिरीने पुढाकार घेतला, तर ५३ पुरुषांनीही आपला सहभाग नोंदवला.

शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ अंतर्गत पहाटे शिवपूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. अपघातग्रस्त आणि गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षितरीत्या रक्तसंकलन करण्यात आले.

रक्तदान शिबिराव्यतिरिक्त सायंकाळी वाशी येथील ‘मणिकर्णिका युद्धकला पथका‘ने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. रात्री ‘शिवस्तुती संगीतोत्सव‘ कार्यक्रमाचाही नागरिकांनी आनंद घेतला. केवळ जल्लोष न करता सामाजिक कार्याची जोड देऊन शिवजयंती साजरी केल्याबद्दल परिसरातून समितीचे कौतुक होत आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना हे योगदान जीवनदायी ठरेल, असा विश्वास समितीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!