पवई, चांदिवली भागात जोरदार गाड्या पळवणे, ट्रिपल सिट प्रवास करणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, सायलेंसरचा आवाज करत गाडी चालवणे अशी कृत्ये करत नागरिकांना त्रास देत हुल्लडबाजी करणाऱ्या १५०० पेक्षा अधिक वाहनचालक तरुण तरुणींवर पोलिसांनी कारवाई करत धडा शिकवला आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश अधिक आहे. घरातून शाळा कॉलेजला जातो सांगून मुंबईच्या रस्त्यांवर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या तरुणांची […]
