मुंबईच्या विविध भागात मोटारसायकली सोबतच रस्त्यावर पार्क गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीने धुडगूस घातला आहे. अशाच दोन घटना पवई परिसरात घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना पवई पोलिसांनी सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांपैकी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. मुसाहीद हजरत अली खान (वय २१ वर्षे) राहणार कालिना सांताक्रूझ असे अटक […]

















