पवईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या अर्टिगा कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २६ नोव्हेंबर) रात्री घडली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र तो पर्यंत कार जाळून खाक झाली होती. […]
Tag Archives | JVLR
जेविएलआरवर सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडले
आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. अतुल खरोसे असे या घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला अटक केली आहे. कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणारे अतुल खरोसे हे पवई येथील एल अँड टी भागात सुरक्षारक्षक […]
जेविएलआरवर धावत्या गाड्यांना आग
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून जाणाऱ्या दोन गाड्यांना आग लागल्याच्या घटना बुधवारी संध्याकाळी पवई परिसरात घडल्या. दोन वेगवेगळ्या घटनेत एक कार आणि एक मोटारसायकल आगीच्या भक्षस्थानी आल्या. यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारस्वत बँकेत मॅनेजर पदावर काम करणारे दादर येथील आपले काम संपवून स्विफ्ट मोटार कार क्रमांक एमएच ४३ बिई ९५२० मधून आपल्या डोंबिवली येथे घरी जाण्यासाठी […]
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीत बदल
इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडद्वारे सुरु असणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचा भाग असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या बांधकामाची सोय करण्यासाठी, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील पवईतील काही भागात वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात येत वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (पूर्व उपनगर ) डॉ.राजू भुजबळ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. वाहतूक निर्बंध २४ जानेवारी २०२४ ते २३ […]
पवईत जेविएलआरवर दोन अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी
पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलला पाठीमागून धडक देवून झालेल्या दोन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही अपघातात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अटक केली आहे. पवईतील रामबाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय आरती शंकर हारके या सोमवारी संध्याकाळी १० वाजता […]
९० फिट रोडसाठी चांदिवलीकरांचा २० ऑगस्टला उपोषणाचा इशारा
विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका अपयशी ठरत असून, त्यांच्या या चालढकल कारभाराविरोधात चांदिवलीकर रविवार, २० ऑगस्टला चांदिवली येथे उपोषणाला बसणार आहेत. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CCWA) नेतृत्वात चांदिवली म्हाडा, डी मार्ट समोर नागरिक हे उपोषण करणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चांदिवलीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत हे उपोषण […]
मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने काढली निविदा; ९८९ कोटींचा खर्च
मेट्रो ६ ही लाईन पूर्णपणे उन्नत असून, वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडते. अंधेरीतील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मेट्रो लाईन-६ मार्गावर धावणाऱ्या सहा डब्यांच्या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची […]
पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एक जखमी
पवईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) गांधीनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवार, २९ जून दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०८ आर ८१३२ गांधीनगरकडून पवईच्या दिशेने जात होती. कार सनसिटी […]
जेव्हीएलआरवर रिक्षातील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवईतील एनएसजी कॅम्पसमोरील भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर चंदू ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या मोठ्या ब्रेकनंतर मुंबई हळूहळू आता पूर्व पदावर येत आहे. याचवेळी गुन्हेगारी प्रवूत्तीत सुद्धा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पवईतील काही भागात चालत्या […]
जेवीएलआरवर पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) पवई प्लाझा येथे झालेल्या अपघातात कचऱ्याच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याच्या घटनेला २ दिवस झाले नसतील की सोमवार, १७ जानेवारीला याच मार्गावर झालेल्या अजून एक अपघातात ५५ वर्षीय पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत हलगर्जीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल खाजगी बस चालक रामबाबू दास (३६) […]
जेविएलआरवर कचऱ्याच्या ट्रकने महिलेला चिरडले; एक किरकोळ जखमी
शनिवारी एका कचऱ्याच्या ट्रकने जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पवईमध्ये घडली. महिला आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होती. या घटनेत महिलेचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख (२२) याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी […]
आयआयटी मार्केट सिग्नल बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) सुरु असणाऱ्या मेट्रो-६च्या कामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या आयआयटी मार्केटजवळील सिग्नलमुळे स्थानिक नागरिकांना जीवावर उदार होत रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली असून, लोकांच्या जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पाठीमागील काही महिन्यांपासून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावरून जाणाऱ्या मेट्रो ६ […]
पवई लायन्स क्लबने दत्तक घेतले आयआयटी मेनगेट समोरील सार्वजनिक शौचालय
डागडुजी आणि अस्वच्छतेमुळे पाठीमागील अनेक महिन्यांपासून खितपत पडलेले आयआयटी मेनगेट जवळील सार्वजनिक शौचालय लायन्स क्लब ऑफ पवईतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. येथून पुढील काळात त्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेचे काम संस्था पाहणार आहे. क्लबचे अध्यक्ष कपिलदेव सिंह आणि सदस्य भवानी शंकर शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय दत्तक घेण्यात आले आहे. नुकतेच शौचालयाचे नूतनीकरण करून ते सार्वजनिक […]
जेविएलआरवर आयआयटी मार्केट गेटजवळ धावत्या कारला आग
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवई येथील आयआयटी मार्केट गेटजवळ एका कारला आग लागल्याची घटना आज, शुक्रवार १२ मार्चला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जोगेश्वरीच्या दिशेने आलेली ह्युंडाई एक्सेंड कार क्रमांक एमएच ४७ एन ५८७६ ही टूरिस्ट कार गांधीनगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतल्याने […]
एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला
शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]
जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे
सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून […]
गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी
पवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार […]
मेट्रो कामात जलवाहिनी फुटली; रात्री ९ नंतर पाणी येण्याची शक्यता
महाराष्ट्रात सध्या अनलॉक १ सुरु झाला असून, विविध ठिकाणी लॉकडाऊन काळात अडकलेल्या कामांना गती दिली जात आहे. असेच काम सुरु असताना जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर ‘मेट्रो-६’च्या कामात आयआयटी मेनगेट समोर जलवाहिनी फुटली. यामुळे बुधवारी दिवसभर पवईतील अनेक भागात पाणीपुरवठा खंडित झाला होता. रात्री ९ नंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिका पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. ८ […]
सावधान: जेविएलआर रस्त्यावर ऑईल पडले आहे, वाहनचालकांनी काळजी घ्यावी
पूर्व आणि पश्चिम उपनगर यांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) ते गांधीनगर या मार्गावर रस्त्यावर गाडीतील ऑईल पडले आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या कामासाठी किंवा इतर कारणांनी बाहेर पडलेल्या वाहनचालकांनी या भागातून प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी. मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरु आहे. या […]
पवईत धावत्या मोटारसायकलला आग
@रविराज शिंदे पवई जेवीएलआरवरील गणेशनगर गणेशघाट येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकलला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. सुदैवाने चालक बचावला असून, मोटारसायकल जळून खाक झाली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत झाल्टे नामक तरुण आपली यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीजे ३११५ वरून गांधीनगरच्या दिशेने […]