गुरुवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास गोरेगांव आगाराची बेस्ट बसगाडी (क्रमांक एम एच ०१ एपी ००८९) बस मार्ग क्रमांक ४२५वर पवई येथून गांधीनगरच्या दिशेने निघाली होती. सदर बसगाडी गांधीनगर जक्शन (JVLR) येथील उड्डाणपूलाजवळ आली असता बसगाडीचे ब्रेक अचानक निकामी झाले. यावेळी बसवर कर्तव्यावर हजर असलेले बेस्ट बस चालक राजू जगन पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, प्रसंगावधान […]



















