लेकहोममध्ये घरकाम करणाऱ्या २ जणांविरोधात घरात १.८ लाखाची चोरी केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक

पवई पोलिसांनी एका महिलेसह घरकाम करणाऱ्या दोन लोकांच्या विरुद्ध त्यांच्या मालकाच्या घरातून १,७०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १.४६ लाख रुपये) आणि ४०,००० रुपये भारतीय चलन चोरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

संशयित – सिंधू सणस आणि चिंतामन राणे (४४) हे दोघे तक्रारदार यांच्या घरी स्वयंपाक बनवणे आणि ड्रायव्हर म्हणून काम करतात.

तक्रारदार सुधीर हेगडे (६६) पवईतील लेक होम्स येथे २०१३ पासून राहत असून, प्रिंटिंग, पॅकेजिंग आणि केमिकल ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी (६० वर्षीय) अश्मिता, सध्या त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी बंगळुरूमध्ये आहेत.

२८ ऑगस्ट रोजी, या जोडप्यासाठी पाठीमागील ७ वर्षापासून साफसफाई आणि स्वयंपाक करणारी मदतनीस सिंधू सणस नेहमी प्रमाणे सकाळी ११.३० ते दुपारी २.३० च्या दरम्यान आपल्या कामावर आली आणि जेवणानंतर निघून गेली.

दरम्यान, घरात इतर कामात व्यस्त हेगडे दुपारी ३ वाजता अंघोळ करून देवघर असलेल्या आपल्या बेडरूममध्ये आले असता त्यांच्या लक्षात आले की बेडरूमचे कपाट जबरदस्तीने उघडण्यात आले आहे. कपाट तपासले असता १,७०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १.४६ लाख रुपये) आणि ४०,००० रुपये भारतीय चलन अशी रक्कम गायब होती.

“याबाबत तक्रारदार यांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सांगून सणस यांना बोलावून घेवून त्यांच्याकडे कपाटात ठेवलेले पैसे मिळून येत नसल्याबाबत विचारणा केली असता सणस यांनी याबाबत त्यांना माहित नसून, तक्रारदार यांनी नजरचुकीने कोठेतरी ठेवले असावेत असे म्हटले,” असे यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “तक्रारदार यांचा ड्रायव्हर राणे याला देखील घरात येण्याजाण्यास मुभा आहे. तक्रारदार यांना दोघांवरही चोरी केल्याबाबत संशय असल्याने त्यांनी ३० ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अंतर्गत पवई पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!