पवईमध्ये पुन्हा मगर दर्शन, नागरिकांची धावपळ; सुरक्षित सुटका

मंगळवारी पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – मुंबई (आयआयएम–मुंबई) परिसरात एका दर्ग्याजवळ सुमारे ७ फूट लांबीची मगर आढळून आली. वाट चुकून एक मगर रस्त्यावर येऊन, पार्किंग केलेल्या वाहनांच्या पाठीमागे लपून बसली. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभाग, प्राणी संघटना आणि पालिका अधिकारी यांच्या मदतीने तिची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

पाठीमागील काही दिवसात मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक जलाशये भरू लागली आहेत. यातीलच एक मुंबईतील पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. या तलावात अनेक मगरी आहेत. यातीलच एक जवळपास ७ फुट लांबीची मगर मंगळवारी सकाळी वाट चुकून बाहेर येऊन चांदशहावाली दर्ग्याजवळ पार्क असणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे जावून लपली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच या परिसरात बघ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली. या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

“येथून जवळ असणाऱ्या एका प्रवाह नाल्याच्या माध्यमातून ही मगर इथपर्यंत पोहचली असावी,” असे यासंदर्भात बोलताना माजी नगरसेवक मनीष नायर यांनी सांगितले.

माहिती मिळताच वन विभाग, रॉ प्राणी संघटनेचे प्रशिक्षित बचाव पथक, महानगरपालिका कर्मचारी यांनी धाव घेत मगरीला काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे सुटका करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

“पावसाळ्यात तलाव, डोह आणि इतर जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगरी अनेकदा अन्न किंवा सुरक्षित आश्रयाच्या शोधात काठाकडे येतात”, असे यासंदर्भात बोलताना वन विभागाने सांगितले.

सुटकेनंतर मगरीच्या प्राथमिक तपासणीनुसार तिची प्रकृती सामान्य आणि स्थिर असून, संपूर्ण वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले जाईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!