निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुन्हा एकदा पक्षाची बांधाबांध सुरु झाली आहे. बांधणीत निवडक आणि वेचक पदाधिकाऱ्यांची वर्णी लागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खास गोटातून समजत आहे. बांधणी करताना पदाधिकाऱ्याचा तळागाळातील मतदारांशी संपर्क आणि जनमानसातील प्रतिमा पहिली लक्षात घेतली जाणार आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील जिल्हाध्यक्षांची निवड सुरु झाली असून, ईशान्य मुंबई […]
Archive | राजकारण, राजकीय पक्ष
Reshma Chougule: Pioneering Change and Empowerment in Powai and Chandivali
In the vibrant neighborhoods of Powai and Chandivali, Reshma Chougule, a distinguished research scientist and MSc topper in chemistry from Ruia College, stands as an inspiring figure. She is the General Secretary of Chandivali Vidhansabha from BJP and is known for her leadership, compassion, and relentless commitment to community welfare. Reshma has garnered attention from […]
पवईत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा
पवईच्या विविध भागात शिवसेना ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना आणि आश्वासने कशी खोटी ठरली आहेत, या विषयी चौक सभांच्या माध्यमातून स्थानिक शिवसेना पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख (१२२) सचिन मदने यांच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन […]
आमदारांकडून पवई विहारच्या समस्यांची पाहणी
पवई विहार कॉम्प्लेक्समधील समस्यांची आमदार दिलीप लांडे यांच्यातर्फे मंगळवारी पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. पवई येथील पवई विहार कॉम्प्लेक्समधील अनेक नागरी समस्या या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वाढत आहेत. तसेच प्रवेश भागातील काही भाग हा न्यायालयीन वादात अडकल्याने देखील समस्या उद्भवत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार लांडे यांनी या […]
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पवईत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त पवईमध्ये शिवसेना शाखा १२२तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाखाप्रमुख सचिन मदने यांच्यावतीने आणि आमदार सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवार, २५ जूनला पवई इंग्लिश हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत आणि पावसाळा निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना […]
पवईतील समस्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त एस वॉर्ड यांना निवेदन
पावसाळा तोंडावर असताना पवईतील अनेक कामे रखडली असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विक्रोळी तालुक्याच्यावतीने पालिका ‘एस’ विभाग (भांडूप) येथील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत नागरी समस्या मांडल्या. यावेळी विक्रोळी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११९ आणि प्रभाग क्रमांक १२२ विभागातील रखडलेली कामे आणि समस्या या संदर्भात मा. नगरसेवक श्री.चंदन चि.शर्मा […]
पवई चांदिवलीतील दोन माजी नगरसेविका शिंदे गटात
चांदिवली येथील प्रभाग क्रमांक १५६च्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर आणि प्रभाग क्रमांक १२१च्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे शिंदे समर्थकात सहभागी झाल्या आहेत. दोघींनीही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांना धक्का बसल्याचे म्हटले जात असतानाच ठाकरे समर्थकांनी याला संपूर्णपणे नाकारले […]
शिवसेना भवनातील टीम शिंदेंच्या गोटात; चांदिवली येथील कार्यक्रमात केला प्रवेश
शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर भाजप सोबत एकत्रित येवून सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात राज्यभरातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरें समर्थक ठाकरे गटाच्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमने उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात […]
चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर; मनोज (बालाजी) सांगळे विभाग युवा अधिकारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावतीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चांदिवली विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या या नियोजनात चांदिवलीतील युवा नेतृत्व मनोज (बालाजी) सांगळे यांची विभाग युवा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाठीमागील काही […]
आमदार दिलीप लांडे शिंदे गटात सामिल; संतप्त शिवसैनिकांनी पोस्टर फाडले, पोस्टरला काळे फासले
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच २३ जूनपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगणारे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी शुक्रवारी सरळ गुवाहाटीत पोहचत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. दिलीप लांडे शिंदे गटात सामिल झाल्याचे समजताच शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडत आपला राग व्यक्त केला. तर काही शिवसैनिकांनी त्यांचे कार्यालय […]
महा राजकारण: मनसे पोस्टर वॉरमध्ये सामील, ‘आता कसं वाटतंय’ म्हणत शिवसेनेला टोला
मुंबईतील साकीनाका परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला उपहासात्मक संदेश देणारे पोस्टर्स लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मैदानात उतरली आहे. उपहासात्मक पोस्टर लावत ते या मैदानात उतरले आहेत. ‘शिवसेना’ आणि ‘एकनाथ शिंदे गट’ यांच्यातील सत्तेची चढाओढ सुरू असतानाच मुंबईतील साकीनाका परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मनसे […]
आमदार लांडेंकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; ओपन जिमचे उद्घाटन
मुंबईत पाठीमागील काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले आहेत. अशावेळी आपल्या विभागातील पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित रित्या झालेली आहेत का? याचा शुक्रवार, १७ जून रोजी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. तसेच हिरानंदानी येथील उद्यानात बनवण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन त्यांच्या […]
पवईत खासदार मॅरेथॉनचे आयोजन
खासदार पवई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईतील, पवईतील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. खासदार खेळ महोत्सव २०२२ अंतर्गत स्थानिक खासदार मनोज कोटक यांच्यातर्फे पवई तलाव भागात या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे व्यवस्थापन निसर्ग स्वास्थ्य संस्थेतर्फे करण्यात आले होते. फिटनेस राखण्यात मॅरेथॉन किंवा धावणे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच याबाबत जनजागृती निर्माण झाल्याने शनिवारच्या […]
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
आवर्तनच्या पाठ्पुराव्याला यश; आमदार लांडेच्या प्रयत्नातून विजय विहार रोडच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
माजी आमदार नसीम खान, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या श्रेयवादानंतर २०१९ पासून दुरुस्ती अभावी खितपत पडून असणाऱ्या विजय विहार समोरील रोडच्या दुरुस्तीचे काम अखेर सोमवारपासून सुरु झाले आहे. स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी रविवारी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला. पवई येथील विजय विहार रोड गेल्या अनेक वर्षापासून लवादात […]
‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ मुंबई काँग्रेस प्रभाग १२२च्या उपक्रमांतर्गत दिव्यांगाना रेशन किटचे वाटप
मुंबई काँग्रेस प्रभाग क्रमांक १२२च्या ‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सुमारे १०० गरजू दिव्यांगांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, पवई अशा अनेक भागातील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सेवेत सक्रिय सहभाग घेतला. कोविड – १९ महामारीपासून देशाला काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर […]
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे बेघरांना ब्लँकेट वाटप
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवई परिसरात राहणाऱ्या बेघर आणि गरजूंना ३०० हून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनने सर्वसामान्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबईला विशेषत: याचा मोठा धक्का बसला आहे. कारण हे शहर मोठ्या संख्येने रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे घर आहे. अनेकांनी […]
गलेरिया सर्कलला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव
पवई, हिरानंदानी गार्डन्स येथील गलेरिया सर्कल म्हणजेच काला खंबा चौकाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, सुदीप्तो लाहीरी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, बिजेपी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान […]
लोकसभेत सायकल ट्रॅकचा मुद्दा उपस्थित; प्रकल्प बंद करण्याची खासदार मनोज कोटक यांची मागणी
७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
मनसे प्रभाग १२२तर्फे आयोजित मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांचे लसीकरण
सोमवार ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक १२२ तर्फे आयोजित एक दिवसीय मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. पवईतील गोखलेनगर येथील मनसे कार्यालयात या एकदिवसीय लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – १९ या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत […]