पवईतील समस्यांवर पोलीस, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांच्यात संवाद

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, १८ जूनला पवई पोलीस ठाण्यातर्फे पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात एका संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच तरुणाईमधील वाढती गुन्हेगारीसह विविध प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली.

पोलिस, जनतेच्या समन्वयातून कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनसेतू तयार होत असतो. यासाठीच पोलीसांतर्फे मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र सारख्या विविध माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न असतो. तसेच याच माध्यमातून पोलीस ठाणे हद्दीतील समस्याही जाणून घेतल्या जात असतात. मात्र पोलिसांवर असणाऱ्या कामाच्या दबावाला पाहता सतत जनतेच्या संपर्कात राहणे पोलीस अधिकाऱ्यांना शक्य होत नसते. म्हणूनच समाजातील संवेदनशील आणि सतत नागरिकांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून परिसरातील समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून केली जात असते. याच अनुषंगाने शनिवारी पवई पोलिसांतर्फे पोलीस ठाण्यात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (कायदा सुव्यवस्था) विजय दळवी यांच्या नेतृत्वात हे चर्चासत्र पार पडले. सामाजिक कार्यकर्ते रमेश देवरे, अनिता सिंग, सुरेश अग्रवाल, पत्रकार अविनाश हजारे (शहर मुंबई), आनंद इंगळे (टीव्ही ९), गौरव शर्मा (प्लॅनेट पवई), प्रमोद चव्हाण (आवर्तन पवई, प्लॅनेट पवई) यावेळी उपस्थित होते. पवईतील विविध समस्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्याबाबतच्या मुद्यांवर यामध्ये चर्चा करण्यात आली.

पोलीस – जनता समन्वय आणि सुसंवाद वाढवण्याबाबतच्या मुद्यांवर पत्रकारांनी यावेळी प्रकाश टाकत तरुणांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी शाळा, महविद्यालयांमध्ये पोलीस दीदी आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यावर भर देणे. परिसरात विविध ठिकाणी चौक जनसंवादाचे आयोजन करून जनतेशी जास्तीत जास्त संपर्क साधणे. परिसरात पायी गस्त वाढवणे अशा विविध उपाय यावेळी सुचवले.

तसेच सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी पोलिसांच्या मदतीने अधिकाधिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!