पवईत भटक्या कुत्र्यांसाठी प्राणीप्रेमींनी उभे केले तात्पुरते पावसाळी निवारे

मुंबई उपनगरातील पवईच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि त्यांना पावसाळ्यात निवारा मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमी पुढे सरसावले आहेत. पवईतील काही भागात या तात्पुरते पावसाळी निवारे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही विकासक कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यानी देखील सहकार्य दिले आहे.

पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील भटकी अनेक जनावरे ही, गाड्यांखाली, पार्किंगमध्ये, घराच्या बाहेरील छतांमध्ये आसरा घेत असतात. मात्र यामुळे काही नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असते. पवईतील काही सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांनी अचानक घुसखोरी केल्याच्या तक्रारी विविध माध्यमातून समोर येत आहेत. यावरच उपाययोजना म्हणून प्राणीमित्रांनी पुढाकार घेत भटक्या कुत्र्यांना आसरा मिळावा यासाठी पवईतील विविध भागात तात्पुरते शेड उभे केले आहेत.

यासंदर्भात बोलताना हिरानंदानी गार्डन येथील हेव्हन्स अ‍ॅबोड फाउंडेशनच्या सीमा शर्मा म्हणाल्या, “दरवर्षी पावसाळ्यात, भटक्या कुत्र्यांना पावसामुळे किती त्रास होतो आणि आसरा न मिळाल्याने भिजल्याने थरथर कापतात हे आपण पाहत असतो. त्यांना आश्रय घेण्यासाठी जागा नसल्याने त्यांच्यावर अशी परस्थिती उद्भवत असते. पावसाळ्यात अनेक कुत्र्यांना त्वचेचे आजार होतात. म्हणून, आम्ही प्राणी प्रेमींनी आणि समुदायातील काही लोकांनी एकत्रित येत भटक्या कुत्र्यांना या अडचणीच्या दिवसांमध्ये हक्काचा निवारा मिळावा यासाठी शेड उभे केले आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, हे सर्व शेड तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. म्हणूनच ताडपत्री आणि बांबू यांचा उपयोग करून तर काही ठिकाणी पुनर्वापरात आणलेल्या प्लास्टिक ड्रमपासून हे निवारे तयार करण्यात आले आहेत.”

अजून एका प्राणीमित्राने यासंदर्भात बोलताना सांगितले की, “काही रहिवाशांनी या तात्पुरत्या कुत्र्यांच्या शेडला आक्षेप घेतला होता, परंतु आम्ही त्यांना याची गरज आणि यामुळे नागरी वस्तीला होणारा फायदा समजावून सांगितल्यावर त्यांनी आपले आक्षेप मागे घेतले आहेत. अनेक रहिवाशी सोसायट्या आणि रहिवाशांनी देखील याला समर्थन दिले आहे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!