
विकृत मानसिकता: एअरगनच्या साहय्याने घेतला श्वानाचा जीव; लेक होममधील घटना
पवईतील लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत एका श्वानाला (कुत्रा) एअर गनच्या साहय्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. श्वानाच्या शरीरात एक्सरेमध्ये दोन एअर गनच्या पुलेट्स डॉक्टरांना मिळून आल्यानंतर ही घटना समोर आली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]

बँक व्यवस्थापक आणि साथीदाराला पाच कोटीची एफडी चोरल्याप्रकरणी अटक
इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे. कापड बाजार आणि […]

वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले
रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका […]

विनायक लोखंडे ठरला ‘नवोदित चांदीवली श्री २०१९’
चांदिवली येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ‘नवोदित चांदिवली श्री २०१९ किताब चेंबूर येथील मसल इंजिनिअर्स व्यायाम शाळेच्या विनायक लोखंडे यांनी आपल्या नावे केला आहे. मुंबईतील विविध भागातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. चांदीवली, पवईच्या इतिहासात प्रथमच एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ती म्हणजे ‘नवोदित चांदीवली श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा २०१९. महाराष्ट्र नवनिर्माण […]

भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]

नागरी समस्या समजून घेण्यासाठी आमदारांचा रहिवाशांसोबत संवाद
विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी शनिवारी सकाळी मुंबई पोलिस, पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत हिरानंदानी पवई येथील फॉरेस्ट क्लब येथे आपल्या मतदार संघातील रहिवाशांसोबत संवाद साधला. परिसरातील समस्या समजून घेण्यासह हिरानंदानी येथील दैनंदिन जीवनावर रहिवाशांच्या दृष्टीकोनातून होणार्या सर्वसाधारण नागरी तक्रारी समजून घेण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप लांडे सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]

एड्स जनजागृतीसाठी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन
१ डिसेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जागरूकता उपक्रम राबविण्यात आले. परंतु पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयाने जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकले. ‘एचआयव्ही/ एड्स साथीची समाप्ती’ या विषयावर शालेय मुलांची वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मुंबई शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. पवईतील पोद्दार इंटरनॅशनल […]

जेकेडी राष्ट्रीय स्पर्धेत एसएमशेट्टीच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब
मुंबईतील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या चिताह राष्ट्रीय जेकेडी स्पर्धेत पवईतील एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रथम नंबर पटकावत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब आपल्या नावे केला आहे. मार्शल आर्ट प्रकारातील ‘जित कुन डो’ (जेकेडी) कला प्रकारचे देशभरात विविध स्पर्धेंचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी याचाच भाग असणारी चिताह राष्ट्रीय जेकेडी स्पर्धा मुंबईत आयोजित […]

नवरा बायकोचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या माजी सैनिकाला अटक
पती – पत्नी दरम्यान सुरु असणाऱ्या भांडणाच्या प्रसंगी पोलिस मदत मागवल्यानंतर निवासस्थानी गेलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण केल्याबद्दल ४९ वर्षीय माजी सैनिकांला पवई पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र लावंड (४९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो पवईतील हिरानंदानी येथे राहतो. संरक्षण दलात तो अल्प कालावधीसाठी (शॉर्ट सर्विस) कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास […]