आपल्या मित्रांना पाहून अलिशान जीवन जगण्यासोबतच सुखवस्तू मिळवण्यासाठी २ अल्पवयीन मुलांनी पवई, हिरानंदानी येथील एका उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट फोडून ३.४५ लाखाचे सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील एक नीट परीक्षेची (NEET) तयारी करत आहे तर दुसरा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. दोघेही सधन कुटुंबातील असून, चांदिवली आणि हिरानंदानी येथील […]
