Author Archive | आवर्तन पवई

pathnatya

पवईत विविध कार्यक्रमांनी ७०वा संविधान दिन उत्साहात साजरा

देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पवईत विविध संस्था, संघटनांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नटराज थिएटर्स मुंबई यांच्या तर्फे २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ७० वा संविधान दिन “संविधान जपताय का?” हे पवईतील विविध भागात पथनाट्य सादर करून साजरा करण्यात आला. या पथनाट्याचे लेखन व […]

Continue Reading 0
Black Magic Powai

जादूटोणाच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या पवईतील मायलेकाच्या जोडीतील एकाला अटक; एक पसार

पवईकरांसह अनेक मुंबईकरांना जादूटोण्यातून भूत उतरवत असल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या आई आणि मुलाच्या जोडीतील मुलाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याची माहिती मिळताच आई पसार झाली आहे. पवईतील एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना तक्रार करताच पवई पोलिसांनी ही कारवाई केली. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईत राहणारी महिला कुसूम लता (बदललेले नाव) हिचा […]

Continue Reading 0
atm-skimming

डेबिट कार्ड क्लोनिंगद्वारे पवईकराचे १.५ लाख सायबर चोरट्याने पळवले

४२ वर्षीय पवईकराच्या खात्यातील १ लाख ५ हजार रुपयांवर कार्ड क्लोनिगच्या माध्यमातून सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे राहणारे राम शर्मा (४२) हे सुतारकाम करतात. त्यांचे इंडीयन बँकेच्या भांडूप […]

Continue Reading 2

चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक

चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा […]

Continue Reading 0
online cheating

निवृत्त शास्त्रज्ञाला मैत्रिणीचा साडेतीन लाखाचा ऑनलाईन गंडा

पवईत राहणाऱ्या एका निवृत्त शास्त्रज्ञाला त्याच्या मैत्रिणीने ३.५ लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ऑनलाईन मैत्री जुळवणाऱ्या साईटवर तक्रारदार याच्याशी मैत्री करत आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून, मोठा व्यवसाय मिळवून देण्याचा बहाणा करून तिने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास करत आहेत. ६७ वर्षीय […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

निरंजन हिरानंदानींच्या नावे गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठगाला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नामांकित उद्योजक आणि विकासक डॉ निरंजन हिरानंदानी यांचा फोटो आणि नावाचा वापर करत देशभरातील उद्योजकांना गंडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. आपण नवीन व्यवसाय सुरु करत आहे त्यात गुंतवणूक करा असा संदेश पाठवून तो तरुण त्यांच्याकडे गुंतवणुकीची मागणी करत होता. मोहमद अरशद असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे […]

Continue Reading 0
burning car on JVLR

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर बर्निग कार

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर टागोरनगर सिग्नलजवळ एका धावत्या कारला आग लागल्याची घटना मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी घडली. सुदैवाने गाडी चालक या घटनेत बचावला असून, गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पवईकडे जाणाऱ्या मार्गावर ही गाडी जळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने पवईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमएच […]

Continue Reading 0
sm shetty road

एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरुवात, वाहतूक वळवली

शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर बुधवारी, १३ तारखेपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील २० ते २५ दिवस हे काम चालणार असून, या मार्गाने चांदिवलीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरून चालणाऱ्या बेस्ट बसेस क्रमांक ३५९ (लिमिटेड) आणि ४०९ (लिमिटेड) यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes