पवईत राहणाऱ्या २३ वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस तरुणीची त्याच इमारतीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी पवईमध्ये घडली. या संदर्भात पवई पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचारी विक्रम अटवाल (३५) याला १० तासाच्या आत अटक केली आहे. मूळची रायपुरची असणारी आणि प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस रुपल ओगरे आपल्या मोठ्या बहिणीसह पवईतील, अशोकनगर भागातील एन […]
Tag Archives | powai newspaper
चांदिवलीतील वाहतूककोंडी फुटणार; लवकरच ९० फूट रस्त्याचे काम सुरू होणार, ८१५ बाधित बांधकामांना नोटिसा
चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने २० ऑगस्टला केलेल्या उपोषणानंतर मुंबई महानगरपालिका पुन्हा खडबडून जागी झाली आहे. चांदिवली येथे विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्याच्या मागणीला जोर देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी या पालिकेने निविदा मागवल्या आहेत. तसेच प्रस्तावित रस्त्याच्या जागेवरील बाधित खासगी आणि सरकारी बांधकामे हटविण्यासाठी पालिकेकडून ८१५ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चांदिवली खैरानी रोड […]
९० फिट रोडसाठी चांदिवलीकरांचा २० ऑगस्टला उपोषणाचा इशारा
विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका अपयशी ठरत असून, त्यांच्या या चालढकल कारभाराविरोधात चांदिवलीकर रविवार, २० ऑगस्टला चांदिवली येथे उपोषणाला बसणार आहेत. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CCWA) नेतृत्वात चांदिवली म्हाडा, डी मार्ट समोर नागरिक हे उपोषण करणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चांदिवलीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत हे उपोषण […]
House Burglary in Powai Hiranandani, Spider Gang Arrested
The crime detection team of the Powai police has managed to apprehend the Spider Gang, who entered the house by climbing the gas pipes of the building in Hiranandani Gardens, Powai. The arrest of this gang is likely to expose the burglaries that have occurred in various parts of Mumbai. The arrested accused have been […]
हिरानंदानीत घरफोडी करणाऱ्या स्पायडर टोळीला अटक
पवईतील हिरानंदानी भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या स्पायडर टोळीला अवघ्या आठवड्याभरात पकडण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीच्या अटकेमुळे पवईसह मुंबईतील विविध भागातील घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्या […]
पोलिसांपासून वाचण्यासाठी सोनसाखळी चोराने लावले सीसीटीव्ही; अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती. जवळपास एक वर्ष आणि चार महिने प्रयत्न केल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांनी त्याच्या मागे पथके लावली होती पण तो कधीच घरात मिळून येत नव्हता. त्याला पकडल्यामुळे पोलिसांना त्याचे एवढे दिवस न पकडले जाण्याचे रहस्य […]
पवईतील सैन्यदलातील जवानाचा श्रीनगरमध्ये कर्तव्यावर मृत्यू, लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार
पवईकर, २७ वर्षीय लान्स नाईक विजय कोकरे यांचा २० जुलै रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटमध्ये तैनात होते. शनिवारी (२२ जुलै) पहाटे पवईतील चैतन्यनगर येथे या वीरपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भर पावसात हजारो लोकांनी गर्दी केली होती. लान्स नायक विजय कोकरे हे मूळचे महाराष्ट्रातील सातारा येथील वासरवाडी […]
माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मदतीला ‘जनता राजा’ आला धावून
पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते […]
तरुणांनी हटवला हरिश्चंद्र मैदानाच्या फुटपाथवरील कचऱ्याचा ढिग; कचरा फेकणाऱ्यावर ५०० रुपये दंड
पालिका, निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी, नेते मंडळी यांना बगल देवून तरुणांनी आपला परिसर स्वतः साफ करत त्यांच्या सणसणीत कानाखाली देत आता पुढच्या वेळी तुमची साफ होण्याची बारी आहे असा संदेशच या कार्यातून दिला आहे. आपला परिसर स्वच्छ राखणे, निटनेटका ठेवणे हे कोणा एकाचे काम नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. हेच ध्येय समोर ठेवत आयआयटी, […]
खड्डेमय डीपी रोड ९वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा चांदिवलीकरांकडून सन्मान
मुंबईतील खराब रस्त्यांच्या यादीत डीपी रोड हा सर्वात वरच्या स्थानावर आहे – चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशन जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेवीएलआर) आणि चांदिवलीला जोडणाऱ्या ‘डीपी रोड ९’च्या दयनीय अवस्थेमुळे हताश होत आणि पालिकेच्या चालढकल कारभाराने उदासीन झालेल्या चांदिवलीकरांनी या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविण्याच्या धाडसासाठी वाहनचालकांचा सत्कार केला आहे. चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशन (सिसिडब्ल्यूए) तर्फे […]
जोरदार पावसामुळे हिरानंदानीत झाडे उन्मळून पडली; दोन गाड्यांचे नुकसान
शुक्रवारी मुंबईमध्ये पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार हवा आणि पावसामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरात दोन झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. रस्त्यावर ही झाडे पडल्याने दोन गाड्यांचे नुकसान झाले. तसेच जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. हिरानंदानी येथील क्लिफ एव्हेन्यू रोडवर लेक कॅसल इमारतीसमोर शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कॅना इमारतीसमोर असणारी दोन […]
पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एक जखमी
पवईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) गांधीनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवार, २९ जून दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०८ आर ८१३२ गांधीनगरकडून पवईच्या दिशेने जात होती. कार सनसिटी […]
Peacock will be Seen in the Powai Nature Park; HHH, Burns and Mcdonnell Environment Project
On 27th June Helping Hands for Humanity (HHH) – a non-profit organisation in collaboration with Burns and McDonnell, a renowned engineering and design firm installed a magnificent peacock sculpture at Powai Nisarg Udyan, a public green space. The sculpture serves as a symbol of environmental consciousness, highlighting the importance of preserving native wildlife and ecosystems. […]
स्विमिंग पूलमध्ये बुडून १० वर्षीय मुलीचा मृत्यू
स्विमिंग पूलमध्ये बुडून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई भारतनगर परिसरात राहणारी दहा वर्षीय प्रियांशी पांडे ही आपल्या काही मित्रांसह परिसरात खेळत होती. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास खेळता खेळता आपल्या मित्रांसह ती […]
अक्षय भालेरावच्या कुटुंबियांना पवईतील तरुणांचा मदतीचा हात
अक्षय भालेराव आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. अक्षयच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा मिळावी. यासाठी १८ जूनला पवईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. भंते शिलबोधी आणी भिखू संघाच्या मार्गदर्शनात काढलेल्या या मोर्चावेळी पवईतील तरुणांनी मदतीचा हात पुढे करत एक लाख दोन हजार ( १,०२,०००₹) रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. २५ जूनला पवईतील तरुणांच्या प्रतिनिधींनी अक्षय भालेराव […]
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पवईत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त पवईमध्ये शिवसेना शाखा १२२तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाखाप्रमुख सचिन मदने यांच्यावतीने आणि आमदार सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवार, २५ जूनला पवई इंग्लिश हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत आणि पावसाळा निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना […]
साकीविहार रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
साकीविहार रोडवरून प्रवास करणाऱ्या एका ५१ वर्षीय प्रवाशाला भरधाव डंपरने चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पवईत घडली. डंपरखाली आल्याने गंभीर जखमी झाल्याने इसमाचा मृत्यू झाला आहे. संजय कांबळे असे मृत पावलेल्या इसमाचे नाव असून, ते एक्तीवा मोटारसायकलवरून प्रवास करत होते. यासंदर्भात पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात डंपर चालकास अटक केली आहे. ऐरोली […]
मोठी बातमी: पंचसृष्टी रोड वाहतुकीसाठी खुला
गुरुवार, २२ जूनला चांदिवली आणि पवई परिसरात चक्काजाम निर्माण झाल्यानंतर अखेर पंचसृष्टी/ राणे सोसायटी रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चांदिवली – हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या या मार्गावर ४ जूनपासून सिमेंट कॉंक्रीटीकरण काम सुरु असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र प्रवाशांचे होणारे हाल पाहता गुरुवारी संध्याकाळपासून वेळेआधीच हलक्या वाहनांसाठी हा रोड वाहतुकीसाठी खुला […]
पवईत तरुणांचा आक्रोश मोर्चा
नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाच्या झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेर्धात तसेच मुंबई येथे तरुणीचा छळ करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात पवईमध्ये रविवारी, १८ जूनला तरुणाईच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भन्ते शिलबोधी आणि भिख्खू संघाच्या नेतृत्वात पवईतील फिल्टरपाडा येथून पवई पोलीस ठाणे पर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात […]
पवईतील समस्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त एस वॉर्ड यांना निवेदन
पावसाळा तोंडावर असताना पवईतील अनेक कामे रखडली असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विक्रोळी तालुक्याच्यावतीने पालिका ‘एस’ विभाग (भांडूप) येथील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत नागरी समस्या मांडल्या. यावेळी विक्रोळी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११९ आणि प्रभाग क्रमांक १२२ विभागातील रखडलेली कामे आणि समस्या या संदर्भात मा. नगरसेवक श्री.चंदन चि.शर्मा […]